Latest

bjp mp varun gandhi : भाजप खासदार वरूण गांधी म्हणतात, शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्याना १ कोटींची मदत द्या

backup backup

मागच्या काही दिवसांपासून बंडखोर भूमिका घेणारे भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत किमतीच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींकडे किमान आधारभूत किमतीबाबत कायदा करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा जीव गेला त्यांना सरकारने प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई जाहीर करावी, असे आवाहनही वरून गांधी यांनी केली आहे. (bjp mp varun gandhi)

वरुण गांधी यांनी शनिवारी (दि.२०) एका पत्राद्वारे कृषी कायदा मागे घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर सरकारने किमान आधारभूत किमतीबाबत कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली.

bjp mp varun gandhi : एमएसपीवर कायदा करा

तसेच 'तीन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्याबद्दल मी तुमचा मोठ्या मनाने आभार मानतो. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आंदोलन संपणार नसल्याचेही ते म्हणाले.

एमएसपीवर कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनात सातशेहून अधिक शेतकरी 'शहीद' झाले आहेत.

कायदे रद्द करण्याचा निर्णय निर्णय आधीच घ्यायला हवा होता.

आंदोलना दरम्यान शहीद झालेल्या आमच्या शेतकरी बंधू-भगिनींच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना प्रत्येकी १ कोटींची भरपाई जाहीर करावी, अशीही विनंती वरून गांधी यांनी केली आहे.

याबरोबर त्यांनी शेतकऱ्यांवर नोंदवलेले एफआयआर रद्द करण्याची मागणीही केली आहे.

लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचे वडील आणि केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप खासदार वरून गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT