Latest

MP Brij bhushan Singh : कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनी पैलवानाला स्टेजवरच लावली कानाखाली, video व्हायरल

backup backup

रांची; पुढारी ऑनलाईन : झारखंडची राजधानी रांचीमध्ये पैलवानांची नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू आहे. या दरम्यान भाजप खासदाराने एका पैलवानाला दोन वेळा कानाखाली लावल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी त्या पैलवानाला थेट स्टेजवरच कानाखाली लगावली आहे. (MP Brij bhushan Singh)

सिंह यांनी त्या पैलवानाला दोन वेळा कानाखाली लगावत खाली स्टेजवरून हाकलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. सिंह यांच्या कृत्यानंतर बाकीच्या पैलवानांनी स्पर्धेदरम्यान जोरदार विरोध करत गोंधळ घातला.

रांची येथे शहीद गणपत राय इनडोअर स्टेडियमवर १५ वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला आले होते.

MP Brij bhushan Singh : वयोमर्यादेमुळे वादावादी

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या कुस्तीपटूला वयोमर्दादेमुळे स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी नाकारली होती. तांत्रिक कारणावरून अपात्र ठरवण्यात आले होते. यावर आक्षेप घेत त्या कुस्तीपटूने स्पर्धेच्या टेक्निकल विभागाकडे तक्रार केली होती.

टेक्निकल विभागाने त्याला खेळण्यास परवानगी नाकारली. यानंतर त्या पैलवानाने स्टेजवर जात भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. १५ वर्षांखालील स्पर्धेत मला भाग घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्या पैलवानाने सिंह यांच्याकडे केली.

यावेळी भाजप खासदार सिंह यांच्याकडे तो वारंवार मागणी करू लागला. यावेळी चिडून त्यांनी त्या पैलवानाला दोनवेळा कानाखाली लावून स्टेजवरून खाली ढकलले.

SCROLL FOR NEXT