Tuberose : कोल्हापुरच्या शेतकऱ्यांने माळरानावर फुलवली गुलछडी, ३० गुंठ्यात लाखो रुपये कमावले

Tuberose : कोल्हापुरच्या शेतकऱ्यांने माळरानावर फुलवली गुलछडी, ३० गुंठ्यात लाखो रुपये कमावले

दानोळी ; मनोजकुमार शिंदे : दानोळी सह परिसरातील तरुण शेतकरी फुल शेतीकडे वळल्याने विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन परिसरात होऊ लागले आहे. येथील तरुण शेतकरी सुदर्शन उर्फ शरद बिरनाळे यांनी गुलछडी (Tuberose) या फुलांच्या उत्पादनातून तीस गुंठे जमिनीत नऊ महिन्यात दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. अजून फोन वर्षे हे उत्पादन सुरू राहणार असल्याने या गुलछडी शेतीला परिसरातील शेतकरी भेटी देत आहेत.

बिरनाळे यांची माळरानावर चार एकर शेती आहे. ऊस उत्पादना बरोबरच ते विविध भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. या आगोदर त्यांनी पारंपरिक झेंडू, गलांडा आदी फुलांचे उत्पादन घेतले.

ते विक्रीसाठी बाजारपेठेत गेल्यावर विविध प्रकारच्या आणि चांगले उत्पादन देणाऱ्या फुलांची माहिती त्यांना मिळाली.

Tuberose : साताऱ्या जिल्ह्यातील शेतीची पाहणी करून घेतले उत्पादन

एक नवीन प्रयोग करावा या विचाराने त्यांनी सातारा जिल्ह्यातील फुल शेतीची पाहणी करून गुलछडी (स्टुबरोज ) फुलांचे उत्पादन घेण्याचे ठरवले.

तज्ञांचे मार्गदर्शन आणि सातारा जिल्ह्यातील फुलं उत्पादक शेतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तीस गुंठे जमिनीत बोंडे लागण केली.

तीस गुंठे जमिनीत गुलछडी फुलांचे बोंडे लागण, कुळपन, भांगलन आदी साठी आज पर्यंत त्यांना तीस हजार खर्च आला आहे. तर दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

विशेष म्हणजे अजून दोन वर्षे हे पिक त्यांना उत्पादन देणार आहे. या साठी येणारा खर्च सुद्धा अगदी कमी असणार आहे.

कोल्हापूर, मुंबई, हैद्राबाद या शहरात फुलांना मागणी

गुलछडी (tuberose) फुले हि बुके, गुच्छ, हार आदीसाठी वापरतात. या फुलांना कोल्हापूर, मुंबई, हैद्राबाद आदी बाजारपेठात मोठी मागणी आहे. फुलांची देटासह कापणी करून ते प्याक करून बाजारपेठेत पाठवले जातात. विशेष म्हणजे हे फुल लवकर कोमेजत नाही. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या पिकाला ऊस पिका पेक्षा कमी प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे भविष्यात या गुलछडी पिकाचे उत्पादन परिसरात वाढणार आहे.

कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. औषध कमी, मनुष्यबळ कमी. बाजारपेठेत मागणी जास्त आहे. एक फुल 10 रुपयाला विकते. यामुळे तरुणांनी या गुलछडीसह विविध प्रकारचे नवीन शेती प्रयोग अवलंबल्यास चांगल्या प्रकारे फायदा घेता येईल.
सुदर्शन उर्फ शरद बिरनाळे, दानोळी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news