Latest

Big Fish : पन्हाळा तालुक्यातील कासारी नदी पात्रात सापडला २० किलोचा मासा

Sonali Jadhav

पन्हाळा, पुढारी वृत्त सेवा : Big Fish :पन्हाळा परिसरात सर्वत्र गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कासारी जांभळी नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक हौशी, तसेच व्यावसायिक मासेमारी सुरू असल्याने मासे खवय्यांची चंगळ झाली आहे. काल पन्हाळा तालुक्यातील आळवे येथे सचिन बंगे हे कासारी नदीवर मासेमारी साठी गेले असताना सचिन यांच्या जाळ्यात अचानक तब्बल २० किलो वजनाचा मासा (Big Fish) मिळून आला. या माशाची चर्चा सर्वत्र आहे.

पन्हाळा तालुक्यातील आळवे येथील सचिन बंगे हे मासेमारी करण्यासाठी कासारी नदीवर गेले होते. त्यांच्या जाळ्यात तब्बल २० किलोंचा मासा अडकला आहे. या २० किलोच्या माशाची (Big Fish) चर्चा सर्वत्र होत आहे. सचिन हे देखील अचानक इतका मोठा मासा जाळ्यात मिळाल्याने आश्चर्यचकित झाले. आतापर्यंत त्यांना एवढा मोठा मासा नदी पात्रात या पूर्वी मिळाला नव्हता. सचिन बंगे यांनी हा मासा विकून साडेसहा हजार रुपये कमावले आहेत.

सचिन बंगे हे अनेक वर्षांपासून मासेमारी करतात. मासेमारीसाठी गळ, गडदे घेऊन अनेक हौशी तरुण मासेमारी साठी पावसाळ्यात नदी काठावर बसतात. वाम, कटल्या, कटरण्या, टिलप, खवली आदी माशांची मासेमारी केली जाते. अनेक ठिकाणी हौस म्हणून मासेमारी सुरू आहे. या माशांना सुमारे चारशे पाचशे रुपये दर मिळतो आहे. माशांच्या बरोबर खेकडे देखील सध्या बाजारात उपलब्ध होत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT