Latest

भोपाळमध्ये मोठी कारवाई; ६ जिहादी दहशतवाद्यांना अटक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ येथे गुप्तचर यंत्रणेने मोठी कारवाई करत रविवारी ६ जिहादी दहशतवाद्यांना अटक  (Terrorists arrested) केली. जुन्या भोपाळमधील फातिमा मशिदीजवळच्या एका इमारतीत हे दहशवादी लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर यंत्रणेने तेथे छापा टाकून या दहशवाद्यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, ऐशबाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर कारवाई केलेले ठिकाण आहे. तरीही येथील पोलिसांना याची कल्पना देण्यात आली नव्हती. याबाबत अधिक माहिती अशी, गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी लपून बसलेल्या इमारतीत छापा टाकला. त्यानंतर ते राहत असलेली खोली पूर्णपणे सील केली. दहशतवाद्यांकडून धार्मिक साहित्य, १० ते १२ लॅपटॉप, स्फोटकांचे साहित्य आणि शस्त्रेही हस्तगत करण्यात आली. अटक केलेले दहशतवादी सुमारे तीन महिन्यांपासून येथे भाड्याने राहत होते. तसेच या इमारतीतील सर्व कुटुंबे भाड्याने राहत असून खाली खोलीतील भाडेकरू बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भोपाळबाहेरील करौंड भागातील एका घरावरही छापा टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर या आधी मध्य प्रदेशातील इंदूर आणि उज्जैनजवळील महिदपूर आणि उनहेल परिसरातून दहशतवाद्यांना अटक केली होती. आता पुन्हा एकदा मोठी कारवाई करत ६ दहशतवाद्यांना अटक (Terrorists arrested) केल्याने संभाव्य मोठा घातपात उधळून लावण्यात गुप्तचर यंत्रणांना यश आले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

SCROLL FOR NEXT