Chechen Army : युक्रेनमध्ये नरसंहार? कीव्हमध्ये रशियाने पाठवले चेचेन योद्धे | पुढारी

Chechen Army : युक्रेनमध्ये नरसंहार? कीव्हमध्ये रशियाने पाठवले चेचेन योद्धे

पुढारी ऑनलाईन डेस्क : १८ दिवसांनंतरही रशिया आणि युक्रेनच्या युद्ध सुरूच आहे. परंतु, युक्रेनची राजधानी कीव्ह अजूनही रशियाला ताब्यात घेता आलेलं नाही. याच दरम्यान, दोन्ही देशांमध्ये चर्चेची चौशी फेरी सुरू होणार आहे. आज १९ व्या दिवशी रशियाने युक्रेनच्या १९ शहरांना वेढा घातला आहे. या शहरांवर हवाई हल्ला होण्याचे संकेत सायरनद्वारे देण्यात आले आहेत. सध्या खारकीव्हमध्ये रशिया क्षेपणास्त्र डागत आहे. हे हल्ले सुरू असताना कीव्हच्या वेशीवर चेचेन योद्धे पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. (Chechen Army)

युक्रेनमध्ये नरसंहार करण्यासाठी, युक्रेनच्या सैन्यांची हत्या करण्यासाठी आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांची हत्या करण्यासाठी रशियाने चेचेन योद्धे पाठवले आहेत. हे चेचेन योद्ध युक्रेनच्या सैन्यावर हल्ले करत आहेत. खतरनाक चेचेन योद्धे कीव्हच्या सीमेवर पोहोचले आहेत, आता ते युक्रेनच्या राजधानीत कहर माजविणार असल्याची शक्यता आहे.

कालच (रविवारी) रशियाने युक्रेनमधील लष्करी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला होता. यात १८० परदेशी मारेकरी मारल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियाने लष्करी प्रशिक्षण केंद्रावर ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात ३५ जणांचा मृत्यू झाला असून १३४ जण जखमी झाले आहेत. त्यांनी पीडितांच्या राष्ट्रीयत्वाची ओळख उघड केलेली नाही. (Chechen Army) रशिया ज्या प्रकारे हल्ले करत आहेत, ते पाहून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा केली आहे. रशियावर आणखी कडक निर्बंध लादण्याबाबत या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलंत का ?

Back to top button