राज्यभरात तब्बल दीड लाख सात-बारा सदोष | पुढारी

राज्यभरात तब्बल दीड लाख सात-बारा सदोष

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यात तब्बल 1 लाख 46 हजार 106 सात-बारा सदोष असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात विसंगती असलेले सर्वाधिक सात-बारा कोकण विभागात आढळले असून सर्वात कमी सदोष सात-बारांची संख्या नाशिक विभागात दिसून आली. महसूल विभागाकडून ऑनलाइन स्वाक्षरीयुक्त डिजिटल सात-बारा नागरिकांना मिळू लागला, तसे सात-बारातील विसंगती निदर्शनास येऊ लागली. त्रुटी लक्षात आणून दिल्यानंतर जास्तीत जास्त सात-बारा अचूक होत आहेत.

भाविकांवर काळाचा घाला, दोन वेगवेगळ्या अपघातांत ९ ठार, २१ जण जखमी

राज्यात पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती हे सहा महसूल विभाग आहेत. या सर्व विभागात सुमारे 2 कोटी 55 लाख 90 हजार सात-बारा आहेत. महसूल विभागाने मागील पाच वर्षांपासून ऑनलाइन सात-बारा देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने कार्यवाही करीत मागील तीन वर्षांपासून डिजिटल स्वाक्षरी असलेला सात-बारा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नागरिकांचे तलाठी कार्यालयाकडे हेलपाटे मारणे कमी झाले आहे.

crude Oil prices : रशिया- युक्रेनमध्ये वाटाघाटीच्या शक्यतेने कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

विशेष म्हणजे स्वाक्षरीयुक्त डिजिटल सात-बारा सर्व शासकीय आणि खासगी कामासाठी वापरण्यात येत आहे. असे असले तरी अजूनही बहुतांश सात-बारांमध्ये अजूनही त्रुटी (विसंगती) असल्याचे दिसून आले आहे. कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे 54 हजार 254 सात-बारांमध्ये त्रुटी राहिल्या आहेत. या विभागातील रायगड जिल्ह्यातील 14 हजार 953 सात-बारा सदोष आढळले आहेत. एकूण विभागांपैकी सर्वात कमी सदोष सात-बारांची संख्या (644 ) नाशिक विभागात आहे. या विभागातील नंदुरबार जिल्ह्यातील 19 सात-बारांमध्ये त्रुटी राहिल्या आहेत.

पाच राज्यांतील पराभवास नेतृत्वाला दोषी न धरता काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिंतन करावे : बाळासाहेब थोरात 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात प्रलंबित असलेल्या 1 लाख 46 हजार 106 हजार सात-बारांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या त्रुटी केवळ 0.57 टक्के राहिल्या आहेत. ते काम लवकरच पूर्ण होईल.
                                                         – सरिता नरके, समन्वयक, ई-महाभूमी प्रकल्प

विभागनिहाय सात-बारामधील विसंगती

  • पुणे  : 47,824
  • नागपूर : 12,021
  • नाशिक : 644
  • औरंगाबाद : 28,903
  • कोकण : 54, 254

Back to top button