Latest

ICC World Cup Final 2023 | टीम इंडिया ‘विजयी भवः’, देशभरात प्रार्थना अन्‌ होमहवन, कुठे आरती, तर कुठे ढोल- ताशाचा गजर

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रविवारी (दि.१९) विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर २ वाजता हा सामना सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना आणि होमहवन केले जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ICC विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयासाठी मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकाल मंदिरात भस्म आरती करण्यात आली. (ICC World Cup Final 2023)

संबंधित बातम्या 

महाकाल मंदिराचे पुजारी महेश शर्मा म्हणतात, "आज आम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा विजय व्हावा म्हणून प्रार्थना केली. भारताने क्रीडा क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात विश्वगुरू व्हावे अशी आमची इच्छा आहे. आम्हाला आशा आहे की भारत आज अंतिम सामना जिंकेल…"

ICC क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासाठी शिवज्ञ प्रतिष्ठानच्या सदस्यांनी नागपुरात पारंपारिक महाराष्ट्रीय ढोल- ताशाचा गजर केला. पुण्यातील श्री सिद्धिविनायक मंदिरातही विशेष आरती करण्यात आली. (IND vs AUS World Cup 2023 final)

तसेच अंतिम सामन्यात भारताच्या विजयासाठी तामिळनाडूच्या मदुराई गणेश मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील सिंधिया घाटावर विशेष प्रार्थना करण्यात आली.

आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्याच्या आधी अभिनेते अनुपम खेर यांनी, "आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल आहे… भारताचा विजय संपूर्ण जगाला कळेल… आम्ही १०० टक्के जिंकू." असे म्हटले आहे.

आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. एका चाहत्याने म्हटले आहे, "शुबमन गिल आणि विराट कोहली आज शतके ठोकतील. तर मोहम्मद शमी पाच विकेट्स घेईल. तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे…"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT