

अहमदाबाद : वृत्तसंस्था : गेले दीड महिना भारतात सुरू असलेल्या क्रिकेटच्या महासंग्रामाची सांगता आज, रविवारी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटचा जगज्जेता कोण? यासाठी अंतिम युद्ध रंगणार आहे. युद्धभूमी आहे अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम.
भारताने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला, तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला हरवले. भारत चौथ्यांदा, तर ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार आहेत. यापूर्वी २००३ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि रिकी पाँटिंगचा ऑस्ट्रेलियन संघ लढले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून जगज्जेतेपद पटकावले होते. २० वर्षांपूर्वी झालेल्या या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता भारताला आहे.
हेही वाचा :