पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणात नवनव्या घडामोडी घडत आहेत. भगवा कोणाचा? धनुष्यबाण कोणाचा? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Bebhan Movie) त्यातच आता शशिकांत पवार प्रोडक्शन प्रस्तुत आगामी 'बेभान' चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. 'भगव्याला महाराष्ट्र विसरला' असं विधान या टीजरमध्ये आहे. त्यामुळे आता चित्रपटाविषयी नवे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. ११ नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात "बेभान" प्रदर्शित होत आहे. (Bebhan Movie)
सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पहाता, या चित्रपटातील एक सामान्य नागरिक हे विधान करतो ते नक्की कोणाच्या बाजूने आहे? कोण विसरला आहे भगव्याला? हा चित्रपट सध्या च्या राजकीय पार्श्वभूमीवर आहे का? उद्या भविष्यात या चित्रपटावर बंदी येणार का? असे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तसेच "झाला बोभाटा', 'भिरकीट' असे उत्तम चित्रपट केल्यानंतर 'बेभान' हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट दिग्दर्शक अनुप जगदाळे घेऊन येत आहेत. त्यांच्याच आगामी 'रावरंभा' या ऐतिहासिक चित्रपटाविषयीही उत्सुकता आहे.
"बेभान" हा चित्रपट दिनेश देशपांडे यांच्या कथेवर बेतलेला आहे. मंगेश कांगणे यांच्या लिहिलेल्या गीतांना ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे. आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ठाकूर अनुपसिंग मराठीत अभिनेता म्हणून पदार्पण करत आहे. अनुपसिंगनं बॉडीबिल्डिंगची मिस्टर वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली होती. ठाकूर अनुपसिंग यांच्यासोबत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि अभिनेते संजय खापरे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.चित्रपटाचा टिझर पाहता, त्यातील वादादीत संवाद काय आहेत?