सातारा; पुढारी वृत्तसेवा : सध्या सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने सातारा शहरातील विकास कामांचा श्रेयवाद उफाळून आला आहे. खासदार उदयनराजे यांनी पोवई नाक्यावर "गतिमान विकासासाठी सातारा विकास आघाडी" CRF निधीतून पोवई नाका ते वाढे फाटा या 15 कोटीच्या मार्गाचा शुभारंभ 22 तारखेला घेणार असल्याचे बॅनर लावले.
या त्यांच्या बॅनर ला प्रतिउत्तर म्हणून आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीने त्याच्या बाजूलाच थेट बॅनर लावत काम कुणाचं आणि नाचतय कोण ? असा प्रश्न विचारत कधी तरी खरं बोला असा बॅनर लावला आहे. आणि विशेष म्हणजे या बॅनर वर आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार हे काम नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याचे पत्रच या बॅनर वर छापले आहे त्यामुळे त्यामुळे आता हा बॅनर बघण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.