Latest

MahaRERA News : राज्यातील 388 गृहप्रकल्पांची बँक खाती गोठवली; पुण्यातील 89 प्रकल्पांचा समावेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रकल्पाच्या प्रगतीशीसंबंधित अद्ययावत माहिती सादर न करणारे राज्यातील 388 गृहप्रकल्प महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथोरिटीने (Maharera) निलंबित केले आहेत. त्यातील 89 प्रकल्प पुण्यातील आहेत. संबंधित प्रकल्पांची नोंदणी प्रक्रिया आणि बँक खातीदेखील गोठविण्यात आली आहेत. महारेरानुसार प्रकल्पाच्या प्रगतीची अद्ययावत माहिती प्रकल्पाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी लागते, शिवाय महारेरालाही त्याची माहिती दर तीन महिन्यांनी सादर करणे बंधनकारक आहे.

संबंधित बातम्या:

त्यात विकलेल्या सदनिका, खर्च, जमा झालेला निधी आणि बांधकामाची प्रगतीही सादर करावी लागते. अशी माहिती सादर न केल्यास महारेरा संबंधितांना नोटीस पाठवून पंधरा दिवसांत माहिती सादर करण्यास सांगते. त्यानंतरही माहिती न दिल्यास 45 दिवसांची 'कारणे दाखवा' नोटीस बजावली जाते. त्यानंतरही अशी माहिती न देणार्‍या 388 प्रकल्पांवर महारेराने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांचे प्रकल्प निलंबित करण्यात आले आहेत. त्यांना प्रकल्पातील सदनिका विकता येणार नाहीत. त्याची जाहिरात करण्यावरही निर्बंध असेल.

मुद्रांक नोंदणी विभागाकडून संबंधित सदनिकांची नोंदणी होणार नाही.

महारेराने निलंबित केलेल्या प्रकल्पांमध्ये पुण्यातील 89, ठाणे 54, पालघर 31, रायगड 22, मुंबई उपनगर 17 आणि मुंबई शहरातील 3 प्रकल्पांचा समावेश आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही प्रकल्पांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी 2023मध्ये नोंदणी झालेले हे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांना 20 एप्रिलपर्यंत त्रैमासिक माहिती सादर करणे आवश्यक होते. मात्र, नोटीस बजावूनही त्यांनी माहिती सादर न केल्याने महारेराने त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT