चंद्रावर ग्रँड कॅनियन, बुर्ज खलिफापेक्षाही अधिक खोल खड्डा | पुढारी

चंद्रावर ग्रँड कॅनियन, बुर्ज खलिफापेक्षाही अधिक खोल खड्डा

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : चंद्राभोवती फिरत असलेल्या ‘नासा’च्या ‘लुनार रिकनायसन्स ऑर्बिटर’वरील ‘लुनार रिकनायसन्स ऑर्बिटर कॅमेरा’ या विविध कॅमेर्‍यांच्या नेटवर्कने आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एक थक्क करणारे दृश्य टिपले आहे. दक्षिण ध्रुवावरील आतापर्यंत पाहण्यात न आलेला एक विशाल खड्डा किंवा विवर यामध्ये दिसून आले आहे.

हा खड्डा आतापर्यंत शोधण्यात आलेला चंद्रावरील सर्वात मोठा खड्डा असून तो ‘बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीच्या उंचीपेक्षा तसेच अमेरिकेतील ग्रँड कॅनियन या विशाल दरीच्या खोलीपेक्षाही अधिक खोल आहे. या विवराचे नाव ‘शॅकलटन क्रेटर’ असे असून त्याची खोली तब्बल 1.3 किलोमीटर आहे. तसेच त्याची रुंदी तब्बल 20 किलोमीटर आहे.

नॅशनल जिओग्राफिक या मासिकाने नासाच्या सहकार्याने या खड्ड्याची हाय रिझोल्युशन कंपोझिट इमेज प्रसिद्ध केली आहे. ‘लुनार रिकनायसन्स ऑर्बिटर’च्या विविध कॅमेर्‍यांनी टिपलेल्या प्रतिमांची मालिका एकत्र करून ही नवी ‘मोझाईक’ प्रतिमा बनवण्यात आली आहे. हे ऑर्बिटर जून 2009 पासून चंद्राभोवती फिरत आहे.

Back to top button