यंदाचा वर्ल्डकप शुभमन गाजवेल : रैना | पुढारी

यंदाचा वर्ल्डकप शुभमन गाजवेल : रैना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी वर्ल्डकप स्पर्धेत शुभमन गिल हा भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणार आहे आणि 2019 मध्ये रोहित शर्माने जो करिष्मा केला होता, तशीच कामगिरी करून शुभमन यंदाचा वर्ल्ड कप गाजवेल, असा विश्वास माजी स्टार फलंदाज सुरेश रैनाने याने व्यक्त केला आहे. जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत रैना म्हणाला की, भारतीय क्रिकेटमधील सध्याच्या घडीला सर्वाधिक पसंतीचा फलंदाज म्हणून शुभमन गिल हे नाव आघाडीवर आहे.

आशिया चषक 2023 स्पर्धेत भारताच्या युवा सलामीवीराने 303 धावा कुटल्या आणि 2023 वर्षात भारताकडून सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आणि वन डे वर्ल्डकप स्पर्धेत शुभमनच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या असणार आहेत. त्याचा फॉर्म पाहता सुरुवातीच्या काळातील विराट कोहली अनेकांना आठवला. शुभमन गिल पुढचा सुपरस्टार आणि विराट कोहली बनू शकतो, मला खात्री आहे की तो त्याच्या आदर्शच्या पावलावर पाऊल ठेवेल.

Back to top button