Latest

सेक्स सीडी प्रकरण : भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्यावर पुन्हा संकट

अमृता चौगुले

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा :  भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध अश्लील सीडी प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) विशेष न्यायालयात सादर केलेल्या अहवालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे एसआयटीकडून क्लिनचिट मिळालेल्या जारकीहोळी यांच्यासमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे.

पीडीत युवतीने एसआयटी स्थापन करण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती दिरा बॅनर्जी आणि जी. के. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सुनावणी केली. उच्च न्यायालयाने एसआयटीला अंतिम अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. पण, या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगिती दिली. एसआयटी स्थापन केल्याच्या याचिकेवर 9 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्याच दिवशी यावर निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला कळवले आहे. एसआयटीने जेसीएमएम न्यायालयाला अंतिम अहवाल सादर केला आहे.

याचिकाकर्त्यांचे वकील विकास सिंग यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, एका मंत्र्याविरुद्ध अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. संशयितानी याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती. त्यांच्या सूचनेनुसारच एसआयटी स्थापन करण्यात आले. युवतीने बंगळुरातील कब्बन पार्क पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हा तपास एसआयटी करत आहे. संशयितानेच तपास कुणी करायचा हे ठरवल्यासारखे आहे, असा युक्तिवाद सिंग यांनी केला. शिवाय तपास पूर्ण करुन बी रिपोर्ट सादर केल्याची माहिती सिंग यांनी खंडपीठाला दिली. त्यामुळे या अहवालाला स्थगितीची मागणी त्यांनी केली.

हे ही वाचलं का 

SCROLL FOR NEXT