Latest

Bakarwadi Recipe : स्वादिष्ट बाकरवडी कशी कराल?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरु झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी (Bakarwadi Recipe), मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास 'बाकरवडी' रेसिपी पाहू या…

साहित्य

१) दोन कप मैदा, तीन मोठे चमचे बेसण

२) दीड चमचा तेल, एक अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ

सारण तयार करण्यासाठीचे साहित्य

१) एक मोठा चमचा बेसन

२) अर्धा चमचा तीळ आणि खसखस

३) अर्धा चमचा किसलेले आले

४) दीड चमचा लसूण पेस्ट

५) तीन चमचे लाल तिखट

६) दीड चमचे पिठीसाखर

७) एक चमचा गरम मसाला

८) एक चमचा धनापावडर

९) अर्धा चमचा बडिशेप

१०) एक चमचा किसलेले सुके खोबरे

११) चार मोठे चमचे बारीक शेव आणि चवीनुसार मीठ

कृती 

१) एका परातीत मैदा आणि बेसन घ्या. त्यात मीठ आणि ओवा घाला. तसेच तेल गरम पीठात घाला. आणि पीठाचा अंदाज घेत पीठ व्यवस्थित मळून घ्या. त्यानंतर किमान २० मिनिटं हे पीठ बाजूला झाकून ठेवा.

२) त्यानंतर मध्यम गॅसवर तवा ठेवून तीळ आणि खसखस भाजून घ्या.

३) सारणासाठीचे सर्व पदार्थ एकत्र करून एक चमचा तव्यावर परतून घ्या. सारण तयार झाले.

४) आता मळलेले मैद्याचे पीठ घ्या. त्याचे छोटे-छोटे गोळे करून त्याची पातळ पोळी लाटून घ्या.

५) त्या पोळीवर २-२ चमचे सारण एकसारखे पसरवून घ्या. त्यानंतर त्याचा रोल करून घ्या.

६) त्या रोलचे एक-एक इंचाच्या अंतरावर कापून त्याचे तुकडे करून घ्या.

७) गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करून घ्या आणि कापलेले तुकडे तळून घ्या.

८) सोनेरी-तपकिरी रंग प्राप्त झाल्यानंतर त्या सर्व बाकरवड्या (Bakarwadi Recipe) एका भांड्यात काढून घ्या आणि थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

पहा व्हिडीओ : बेसनाच्या लाडूची रेसिपी

या रेसिपी वाचल्यात का? 

SCROLL FOR NEXT