Latest

Baaplyok Movie : वडील मुलाच्या नात्याची गोष्ट ‘बापल्योक’, ट्रेलर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाप लेकाचं नातं दिसत नाही कारण ते अबोल असतं. चित्रपटांमधून फारसं न दिसणारं बाप लेकाचं हे नातं आगामी 'बापल्योक' चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणार आहे. (Baaplyok Movie ) 'नाईंटीनाईन प्रोडक्शन्स'चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स'च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. बाप लेकाच्या नात्याचा प्रवास दाखवणारा या चित्रपटाचा मनस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Baaplyok Movie )

अल्पावधीतच या ट्रेलरने वन मिलियन व्ह्यूज टप्पा गाठला आहे. ट्रेलर आणि चित्रपटातील ' उमगाया बाप रं' हे गीत सध्या ट्रेंडिंगला आहे. नागराज मंजुळे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून रिंगण, कागर, सोयरीक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. 'बापल्योक' चित्रपट २५ ऑगस्टला चित्रपटगृहांत दाखल होतोय.

'बापल्योक' चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT