Latest

Ayodhya Ram Temple : अयोध्येत २६ जानेवारीपासून भाविकांना दर्शन घेता येणार

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील साधू-संतांच्या उपस्थितीत 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी 26 जानेवारीपासून मंदिर खुले होणार आहे. (Ayodhya Ram Temple)

  संबंधित बातम्या :

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले की, 22 जानेवारीला उद्घाटन झाल्यानंतर 26 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. पण त्याआधी 22 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रण देण्यात आले आहे, त्यांना दर्शनाची संधी मिळणार आहे. राज्यनिहाय या निमंत्रितांना फोन करून त्यांच्या दर्शनाच्या वेळा कळवण्यात येतील. 26 जानेवारीपासून दर्शन घेणार्‍यांना आधी नोंदणीकरून ऑनलाईन तिकिटे घ्यावी लागणार आहेत. (Ayodhya Ram Temple)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT