Latest

Assembly Election Results : विकास आणि विश्वास मोदीजींच्या सोबत ; देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेची सेमीफायनल असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  करिश्मा पुन्हा एकदा दिसून आला आहे. चार राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने निर्णायक बहुमताकडे झेप घेतली आहे.तेलंगणात काँग्रेसने बाजी मारत भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) सत्तेतून बाहेर केले आहे. (Assembly Election Results) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालाच्या पार्श्वभुमीवर पोस्ट करत म्हटलं आहे की,  "विकास आणि विश्वास मोदीजींच्या सोबत आहे."

Assembly Election Results : विकास आणि विश्वास…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,'विकास आणि विश्वास मोदीजींच्या सोबत आहे'

माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की, या निकालाने मी अतिशय आनंदी आहे. आणि यावर मी सविस्तर नंतर बोलेन…

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी १२.३० पर्यंत मध्य प्रदेशमध्ये भाजप १६० जागांवर आघाडीवर होते. तर काँग्रेस ६७ आणि बीएसपी २ जागांवर पुढे होते. राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव होताना दिसत असून येथे भाजपने १११ जागांची निर्णायक आघाडी घेतली आहे. तर येथे काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसडमध्ये सुरुवातीला काँग्रेस आघाडीवर आहे असे दिसत होते. पण दुपारनंतर चित्र बदलले आणि छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांपैकी भाजपने ५४ जागांवर मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT