Latest

नवरी नटली! देवमाणूसच्या अस्मिता देशमुख हिचा नवा लूक पाहून चाहते थक्क

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : 'देवमाणूस' ही मालिका चाहत्याच्या घराघरात पोहोचली होती. या मलिकेतील खास करून डिंपलच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतले होते. यात डिंपलची भूमिका अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने साकारली. सध्या डिंपल म्हणजे, अस्मिता देशमुख ब्रायडल लूक म्हणजेच नवरीच्या वेशात समोर आली आहे.

नुकतेच तिने आपल्या इंन्स्टाग्रामवर पारंपारिक वेशभूषेतील फोटो (ब्रायडल लूक) शेअर केले आहेत. 'देवमाणूस' मालिकेनंतर तिचा नवा मेकओव्हर चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

या फोटोत अस्मिता लाल रंगाच्या भरजरी लेहंग्यात दिसत आहे. यासोबत तिने हातात सुंदर तोडे आणि गळ्यात भरगच्च दागिने परिधान केले आहेत. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने 'डिंपल को सिंपल रेहना पसंद नहीं.' दुसऱ्या एका युजर्सने 'डिंपल तू खरंच सिंपल नाही, मोठी हिरोईन झाली.' तर तिसऱ्याने 'खूपच ग्लॅमरस' असे लिहिले आहे. यासोबत चाहत्यांनी प्रेमाचा आणि फायर इमोजी देखील शेअर केला आहे.

याशिवाय तिचा आणखी एक हिरव्या रंगाच्या साडीतील पारंपारिक लूक समोर आला आहे. यात ही तिचे रूप खुलून दिसत आहे. या फोटोला चाहत्यांनी 'अस्सल मराठी लूक!' अशी कमेंट्स देत हास्याचा इमोजी शेअर केला आहे.

छोटया पडद्यावरील 'देवमाणूस' ही मालिका संपली आहे. परंतु, अस्मिता तिच्या हटके फोटोशूट करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते.

ती नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. 'देवमाणूस' ही तिची पहिलीच मालिका असून ती यातून प्रकाश झोतात आली.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT