Latest

Asian Games 2023-Boxing बॉक्सिंगमध्ये प्रिती पवारला कांस्य; पॅरिस ऑलिम्पिकचे स्थान निश्चित

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: एशियन गेम्समध्ये १९ वर्षीय भारताच्या प्रिती पवारने आज (दि.०३) कांस्यपदकाची कमाई केली. तिने २०१८ च्या एशियन गेम्समधील चीनची सुवर्ण विजेती चांग युआन विरुद्ध कडवी झुंज देत, कांस्यपदकावर मोहर उमटली. एशियन गेम्समध्ये तिच्या कामगिरीमुळे २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील तिचे स्थान निश्चित झाले आहे. (Asian Games 2023-Boxing )

संबंधित बातम्या:

एशियन गेम्समध्ये ५४ किलो वजनी गटात प्रितीने उपांत्य फेरीत चीनच्या युआन चांगविरुद्ध कडवी झुंज दिली. पण तिला यश मिळाले नाही, त्यामुळे तिला युआन चांगविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पण भारताची बॉक्सर प्रिती पवारने कांस्यपदक पटकावले. त्यामुळे २०२४ च्या पॅरिसमध्ये होणाऱ्या  कामगिरी ऑलिम्पिकसाठी प्रितीचे स्थान निश्चित झाले आहे, हे अभिमानास्पद आहे. (Asian Games 2023-Boxing )

एशियनमध्ये एकूण ६२ पदकांसह भारत चौथ्या स्थानी

एशियन गेम्समध्ये पदतालिकेत एकूण ६२ पदकांची कमाई करत भारत चौथ्या स्थानी आहे. भारताने आत्तापर्यंत १३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २५ कांस्य पदकाची कमाई केली आहे. पदतालिकेत २७६ पदकांसह चीन पहिल्या स्थानी आहे. जपान १२४ पदकासह दुसऱ्या तर रिपब्लिक १३६ पदकांसह पदतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. यासंदर्भातील माहिती डीडी न्यूजने X वरून दिली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT