Latest

Galwan Controversy : अशोक पंडित यांच्याकडून रिचा चड्ढाविरोधात तक्रार दाखल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिचा चड्ढा (Richa Chadha) ला गलवानवरून भारतीय लष्कराचा अपमान केल्याबद्दल तिला माफी लागली होती. पण अजूनही तिच्या अडचणी संपलेल्या नाहीत. एका ट्विटवरून ती सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आली. (Galwan Controversy) आता चित्रपट निर्माते अशोक पंडित संतप्त झाले आहेत. त्यांनी रिचाविरोधात जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. त्यांनी रिचाविरोधात मोठी कारवाई करण्याची मागणी केलीय. (Galwan Controversy)

चित्रपट निर्माते अशोक पंडित हे रिच्याच्या कमेंटमुळे खूप दु:खी आहेत. त्यांना वाटतं की, रिचाने याप्रकारे भारतीय लष्कर आणि गलवानच्या शहीद जवानांचे अपमान केले आहे. तिने जाणूनबुजून हा अपमान केल्याचे त्यांचं म्हणणं आहे. कमांडर लेफ्टनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या स्टेटमेंटनंतर रिचाने ट्विट केलं होतं की, 'Galwan says hi'.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळ‍वारी म्हटलं होतं की, "भारतीय सैन्यदल पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घेण्यास तयार, आदेशाची वाट पाहतोय, आदेश पूर्ण करण्यासाठी तयार आहे." यावर विधान करत रिचा चड्ढाने लिहिलं की, 'गलवान (Galwan) Hi म्हणत आहे.'

काय म्हणाले होते लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी?

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हणाले होते- सरकार जो आदेश देईल त्याचं पालन केलं जाईल. आम्ही कोणतीही कारवाई करण्यास तयार आहोत. सरकार जसा आदेश देईल तसे आम्ही कृती करु. पाकिस्तानने शस्त्रबंदीचं उल्लंघन केलं तर आम्हीही सडेतोड उत्तर देऊ, असा सज्जड दमदेखील उपेंद्र द्विवेदी यांनी पाकला दिला होता.

हेदेखील वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT