Latest

Artemis mission : तुमचं नाव आता चंद्रावर पाठवण्याची संधी; नोंदणीसाठी ‘नासा’चं आवाहन

दीपक दि. भांदिगरे

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेची अंतराळ संस्था अर्थात नासाने लोकांना त्यांची नावे चंद्रावर पाठविण्यासाठी आवाहन केले आहे. 'आर्टेमिस' चांद्र मोहिमेसाठी (Artemis mission) 'नासा' लोकांची नावे पाठविणार आहे. नासाने "Send your name with Artemis" ही मोहीम २ मार्च रोजी सुरु केली होती. आतापर्यंत या मोहिमेसाठी १७ लाखांहून अधिक नावे आली आहेत. आता स्पॅनिश भाषिकांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे यासाठी नासाकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. नासा ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना प्रतिकात्मक बोर्डिंग पासेस देण्यात येणार आहे. त्यासाठी https://www.nasa.gov/send-your-name-with-artemis/ यावर नोंदणी करावी लागणार आहे.

तुमचा बोर्डिंग पास तयार करण्यासाठी तुमचे नाव आणि pin एंटर करावा लागेल. त्यासाठी तुमचा pin लक्षात ठेवा. भविष्यात तुमच्या बोर्डिंग पासमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला त्याची आवश्यकता असेल, असे नासाने म्हटले आहे.

येत्या काही महिन्यांत प्रक्षेपित होणार्‍या या उड्डाणामुळे चंद्रावर पहिल्यांदाच महिला पाऊल ठेवणार आहे. ओरियन अंतराळयान चंद्राच्या मागे ४० हजार मैल (६४,४०० किमी पेक्षा जास्त) च्या कक्षेत पोहोचणे अपेक्षित आहे, याचा अर्थ ते पृथ्वीपासून २ लाख ८० हजार मैल (४ लाख ५० हजार किमी पेक्षा जास्त) आत असेल, असे नासाने म्हटले आहे.

आर्टेमिसचे (Artemis mission) उद्दिष्ट मानवाला सोबत घेऊन सखोल अंतराळ संशोधन करणे हे आहे. NASA च्या आर्टेमिस प्रोग्रामला नैसर्गिक उपग्रहावर सतत मानवी उपस्थिती स्थापित करायची आहे. त्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे. १९७० च्या दशकात नासाने अपोलो मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर स्वारी केली होती. आता चंद्रावर स्वारी करण्याची तयारी नासा करत आहे.

'नासा'ने नुकतेच ब्रह्मांडाचे भव्य चित्र तयार केले आहे. खरोखरच ब्रह्मांड किती मोठे आहे, याची कल्पना माणसाला नाही. भविष्यात ती होण्याची शक्यताही कमीच आहे. मात्र, आजपर्यंत माणसाने जितके ब्रह्मांड पाहिले आहे, ते चित्रात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खरोखरच हे छायाचित्र अत्यंत आल्हाददायी आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT