रॉकेट जाऊ शकत नाही, तेथे ‘नासा’चे मिशन | पुढारी

रॉकेट जाऊ शकत नाही, तेथे ‘नासा’चे मिशन

वॉशिंग्टन : नॉदर्न लाईटस् म्हणजे अरोरो ज्यावेळी सक्रिय होतात, त्यावळी त्यांच्याजवळून कोणत्याही प्रकारचे रॉकेटस् अथवा सॅटेलाईटस् चालवले जात नाहीत. कारण नॉदर्न लाईटस्मधून बाहेर पडणारे तीव्र इलेक्ट्रोमॅग्नेेटिक तरंग हे सॅटेलाईट अथवा रॉकेटस् नष्ट करू शकतात. मात्र, आता अमेरिकन संशोधन संस्था ‘नासा’कडून सक्रिय नॉदर्न लाईटस्नजीक एक रॉकेट पाठवले जाणार आहे.

‘नासा’कडून तातडीने अलास्कास्थित पोकर रिसर्च सेंटर रेंजपासून आयन-न्यूटल कपलिंग ड्यूरिंग अ‍ॅक्टिव्ह म्हणजे आयएनसीएए मिशन प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या मिशनच्या माध्यमातून रॉकेट नॉदर्न लाईटस्मधून उडाण करत त्यांची तीव्रता, ऊर्जा, उष्णता इत्यादींचा अभ्यस करण्यात येणार आहे. कारण भविष्यात नॉदर्न लाईटस् मानवासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नॉदर्न लाईटस्च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार आणि साठवली जाऊ शकते.

पृथ्वीच्या वातावरणाचे अनेक थर आहेत. यामधील ट्रोपास्फेअर नामक थराखाली आपण राहतो. हा थर वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे. हा थर न्यूट्रल पार्टिकल्सने बनला असून आम्ही तेथे श्वास घेतो. ऑक्सिजन व नैट्रोजन हे वायू आम्ही श्वासातून घेतो, जे चुंबकीय स्तरावर संतुलित अणू आणि कणांनी बनली असते. मात्र, शेकडो कि.मी. उंच अवकाशात असे होत नाही. या अणूंपासून इलेक्ट्रॉन तुटून बाहेर पडतात आणि फिरत राहतात. ते प्लाझ्माची निर्मिती करतात. प्लाझ्मा हे फार उष्ण असतात. हेच तत्त्व नजरेसमोर ठेऊन ‘नासा’ नॉदर्न लाईटस्च्या मदतीने ऊर्जा तयार करता येते का, याची चाचपणी करणार आहे.

Back to top button