Latest

येस बँक-डीएचएफएल घाेटाळा प्रकरण : अविनाश भोसले यांना सीबीआयने चौकशीसाठी दिल्लीला आणले

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

येस बँक आणि दिवाण हौसिंग फायनान्स लि.च्या (डीएचएफएल ) माध्यमातून करण्यात आलेल्या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्‍यात आलेले  पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने चौकशीसाठी दिल्लीला आणले आहे. मुंबईतील न्यायालयाने भोसले यांना नुकतीच 10 दिवसांची कोठडी दिली होती. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसले यांचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला होता.

सीबीआयने भोसले यांना २६ मे रोजी पुण्यात अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात त्याना हजर करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली होती. यानंतर आता ते यस बँक- डीएचएफएल घोटाळा प्रकरणात अडकले आहेत. भोसले यांना चौकशीसाठी मंगळवारी रात्री दिल्लीत आणले असल्याचे सीबीआय सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT