Latest

Co-operative Societies : सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांच्या पॅनेलवर शिक्कामोर्तब; सहकार आयुक्तांच्या प्रस्तावास मान्यता 

अविनाश सुतार
पुणे: पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणाकरिता अखेर लेखापरिक्षकांची नामतालिका (पॅनेल) तयार केली आहे. त्यामध्ये एकूण 13 हजार 797 लेखापरिक्षकांचा समावेश आहे. शासकीय लेखापरिक्षकांची संख्या 1392 इतकी आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांच्या लेखापरिक्षक पॅनेलचा प्रश्न संपुष्टात आला असून त्याची मुदत 2024-2026 अशी आहे.  Co-operative Societies
लेखापरिक्षकांची नामतालिका तयार करुन सहकार आयुक्तांनी शासनास सादर केली होती. त्या नामतालिकेस नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 13 हजार 797 एवढ्या लेखापरिक्षकांच्या नामतालिकेस 7 फेबु्रवारी 2024 ते 31 मार्च 2026 या कालावधीकरिता शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी संस्थांच्या लेखापरिक्षण वर्गीकरणाचा तपशिल देण्यात आला आहे. लेखापरिक्षकांची श्रेणी व सहकारी संस्थांच्या वर्गीकरणानुसार अटी व शर्तीच्या अधिन राहून सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Co-operative Societies
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 चे कलम 69 अन्वये सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणाची तरतूद आहे. निबंधकांनी तयार केलेल्या व राज्य सरकारने मान्यता दिलेल्या नामतालिकेवरील (पॅनेल) लेखापरिक्षकांकडून सहकारी संस्थांनी लेखापरिक्षण करवून घ्यावयाचे आहे. या अधिनियमान्वये सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण करण्याकरिता लेखापरिक्षकांच्या नेमणुकीची स्वायत्ता संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस देण्यात आलेली आहे.
 "कोरोना काळामुळे गेली चार वर्षाहून अधिक काळ मुदत संपूनही लेखापरिक्षकांचे पॅनेल तयार झाले नव्हते. तत्कालीन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी शासनाकडून लेखापरिक्षक पॅनेल मान्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही स्वागत करतो. लेखापरिक्षकांची लेखापरिक्षणासाठीची वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत करावी, अशी आमची मागणी आहे.
– चंद्रशेखर भोयर, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-ऑप ऑडिटर्स असोसिएशन
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT