Latest

Anshula Kapoor : तथाकथित बॉयफ्रेंड रोहनसोबत थायलंडला पोहोचली अंशुला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर २९ डिसेंबरला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. तिच्या ३२ व्या वाढदिवसासाठी ती खूप उत्साही आहे. (Anshula Kapoor ) अंशुला सध्या तथाकथित बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत थायलंडमध्ये सुट्टी घालवत आहे. ज्याचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ त्याने स्वतः त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. (Anshula Kapoor )

बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर सध्या पटकथा लेखक रोहन ठक्करसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच मीडियासमोर उघडपणे बोलत नसले तरी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट अनेक नकळत किस्से सांगतात. पुन्हा एकदा अंशुला कपूर रोहनसोबत रोमँटिक पोजमध्ये एक फोटो शेअर करून चर्चेत आहे. अर्जुन कपूरची लाडकी बहीण तिच्या वाढदिवसासाठी खूप उत्सुक आहे. त्यासाठी ती आधीच थायलंडच्या सहलीला रवाना झाली आहे.

अंशुलाने ११ डिसेंबर रोजी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर थायलंड व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. ज्यामध्ये ती म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी होताना दिसत आहे. फोटोमध्ये अंशुला पांढऱ्या टॉप आणि गुलाबी पॅन्टमध्ये पोज देत आहे. अंशुलाच्या चेहऱ्यावरची चमक तिचा आनंद सांगण्यासाठी पुरेशी आहे.

मैफिलीत नाचणारी अंशुला

अंशुला कपूरच्या व्हिडिओमध्ये ती गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. त्याचे मित्रही मिळून खूप धमाल करत आहेत. ही पोस्ट शेअर करत अंशुलाने इन्स्टाग्रामवर लिहिले की, 'वाढदिवसाचा महिना धमाकेदारपणे सुरू होतो. खूप डान्स केला, आता सकाळी १ वाजता पायांना मसाज लागेल. मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता की कॉर्सेट टॉप घालण्यात मला इतका आनंद मिळेल.

अंशुला – रोहनचे प्रेम

अंशुलाच्या सर्व पोस्ट्समध्ये, रोहनसोबतच्या रोमँटिक पोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रात अंशुला आणि रोहन हातात हात घालून दिसत आहेत. या लव्ह बर्डचे प्रेमाने भरलेले डोळे आणि स्मित हास्य त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर कुठेतरी शिक्कामोर्तब करते. मात्र, एका मुलाखतीत जेव्हा अंशुलाला रोहनला डेट करण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, मला याबाबत कोणतेही वक्तव्य करायचे नाही किंवा बोलायचे नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT