गोविंदाची रेखाला डेट करायची इच्छा | पुढारी

गोविंदाची रेखाला डेट करायची इच्छा

पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री रेखा चित्रपटांव्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अमिताभ बच्चन यांच्याशी असलेले कथित अफेअर असो किंवा वैवाहिक जीवन रेखा कायम चर्चेत असते. रेखाच्या चाहत्यांची यादी मोठी आहे. गोविंदा आणि राकेश रोशन यां यांनीही रेखाला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सिमी ग्रेवालच्या शोमध्ये बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अशाच एका एपिसोडमध्ये गोविंदा पोहोचला होता, त्यावेळी त्याला विचारण्यात आले की, जगातील अशाच एका व्यक्तीचे नाव घे जिच्याबरोबर तुला डेटवर जायचे आहे. यावर गोविंदा म्हणाला, मी रेखाजींचा खूप मोठा चाहता आहे, मला त्यांच्याबरोबर डेटवर जायला आवडेल. गोविंदाचे उत्तर ऐकून सिमी त्याला म्हणते, राकेश रोशनने डेटवर जाण्यासाठी रेखाचे नाव घेतले होते. यावर गोविंदा केवळ हसला.

Back to top button