Latest

भयंकर! मणिपूरमधील आणखी एक सामूहिक बलात्‍काराचे प्रकरण उजेडात, नराधमांना कठोर शिक्षेची पीडितेची मागणी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूरमधील हिंसाचारावेळी घडलेले आणखी सामूहिक बलात्‍काराचे भयंकर प्रकरण समोर आले आहे. निवारा छावणीत राहणार्‍या पीडित महिलेने बुधवारी बिष्णुपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या 'शून्य एफआयआर'सोबत तिच्‍यावर झालेल्‍या अमानूष अत्‍याचाराला वाचा फोडली आहे. या प्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयीसी) च्या कलम ३७६ ड, ३५४, १२० ब, आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे वृत्त 'एनडीटीव्‍ही'ने दिले आहे. ( Manipur Gang-Rape Horror )

सामाजिक बहिष्‍काराच्‍या भीतीने केली नव्‍हती तक्रार

"मी स्वतःची आणि माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि सामाजिक बहिष्‍काराच्‍या भीतीने ही घटना उघड केली नव्‍हती. मात्र माझी कोणतीही चूक नसताना माझ्यावर केलेल्या अमानूष अत्‍याचारानंतर मला जो त्रास सहन करावा लागला याची मला जाणीव होऊ लागली आहे. माझ्यावर अत्याचार, लैंगिक आणि शारीरिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी पीडित महिलेने केले आहे.

Manipur Gang-Rape Horror : पीडित महिला जमावाच्‍या तावडीत सापडली…

मणिपूर राज्‍यातील चुराचंदूपर जिल्‍ह्यात ३ मे रोजी कुकींनी काढलेल्या मोर्चानंतर जिल्ह्यात हिंसाचार उसळला. याच दिवशी झालेल्‍या प्रकाराबददल पीडित महिलेने तिच्‍यावर झालेल्‍या अमानूष अत्‍याचाराची माहिती फिर्यादीत दिली आहे. तिने फिर्यादीत म्‍हटलं आहे की, " ३ मे रोजी सायंकाळी जमावाने तिच्‍या घराला आग लावली. तिने मुले व भाचीसह आपल्‍यावहिनीसोबत पलायनाचा प्रयत्‍न केला. यावेळी ती खाली पडली. तिची वहिनी पुन्‍हा धावत परत आली. भाचीला माझ्या पाठीवरून उचलले. पीडितेने तिच्‍या दोन मुलांना मुलांना घेवून जाण्‍यास सांगितले. यानंतर पीडित मी जमावाच्‍या तावडीत सापडले. नराधमांनी मला शिवीगाळ आणि मारहाण केली. माझ्या प्रतिकारानंतरही मला बळजबरीने खाली पाडण्यात आले. यानंतर माझ्‍यावर सामूहिक बलात्‍कार केला."

अमानूष अत्‍याचारानंतर स्‍वत:ला संपविण्‍याच्‍या विचार…

पीडित महिलेने म्‍हटलं आहे की, स्वतःची आणि कुटुंबाची प्रतिष्ठा राखण्‍यासाठी तसेच सामाजिक वंचिततेपासून वाचण्यासाठी ती तब्‍बल तीन महिन्‍यांहून अधिक काळ या भयंकर अत्‍याचाराबद्‍दल कोठेही बोलली नाही. राजधानी इंफाळमधील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये गेली होती, परंतु डॉक्टरांना न भेटता परत आली कारण या घटनेने तिला जबर मानसिक धक्‍का बसला होता. ती कोणा पुढेही व्‍यक्‍त होवू शकत नव्‍हती. या काळात मी स्वतःला संपविण्‍याच्‍या विचारात होते, अशीही व्‍यथा पीडित महिलेने मांडली आहे. Manipur Gang-Rape Horror

Manipur Gang-Rape Horror :  समुपदेशनानंतर फिर्याद देण्‍याचा निर्णय

तब्येत बिघडल्याने पीडित महिला पुन्‍हा इंफाळमधील 'जेएनआयएमएस' रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले आणि समुपदेशन केले. तसेच तिला तक्रार देण्‍याचा सल्‍ला दिला. यानंतर पीडित महिलेने बुधवारी बिष्णुपूर पोलिस ठाण्यात ' झिरो एफआयआर' दाखल केली. कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये 'झ्रिरो एफआयआर' दाखल केली जावू शकते.आता संबंधित पोलिसांनी एफआयआर योग्य अधिकारक्षेत्राकडे पाठवावा, अशी विनंतीही तिने केली आहे.

 विवस्‍त्र धिंडचा व्‍हिडिओ समोर आल्‍यानंतर उसळली हाेती संतापाची लाट

मागील महिन्‍यात मणिपूरमधील दोन महिलांना रस्त्यावर विवस्‍त्र धिंड काढण्‍यात आल्‍याचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर
व्‍हायरल झाला होता. यानंतर मणिपूरमधील हिंसाचारावेळी महिलांवर झालेल्‍या अत्‍याचाराला वाचा फुटली. याप्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षांनी केंद्र सराकराला धारेवर धरले. लोकसभेत अविश्‍वास प्रस्‍तावही आणला. याप्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायलयानेही गंभीर दखल घेत. केंद्र आणि राज्‍य सरकारला चौकशी अहवाल सादर करण्‍याचे आदेश दिले होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT