Latest

‘अंकिता-विक्की’ कडून राज्यपाल कोश्यारींना लग्नाचं आमंत्रण (Photos)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

'अंकिता-विक्की' यांचे १४ डिसेंबरला लग्न आहे. त्यांच्या लग्नाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. 'अंकिता-विक्की' यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यांच्या लग्नात कोणकोणते स्टार आणि दिग्गज सहभागी होणार, हे अद्याप सस्पेन्स आहे. दरम्यान, लग्नपत्रिका देण्यासाठी हे दोघे राजभवन येथे पोहोचले. त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना लग्नपत्रिका देत आमंत्रण दिलं. याची माहिती स्वत: तिने सोशल मीडियावरून दिलीय.

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत आपल्या आयुष्यातील अपडेट्स देत असते. तिने बॉयफ्रेंड जैनसोबत जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या क्षणांचे फोटोही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये अंकिता लोखंडे व्हाईट कलरच्या साडीत दिसतेय. तर तिचा बॉयफ्रेंड जैनने ब्लॅक ॲण्ड व्हाईट पँट-शर्ट परिधान केला आहे. दोघे भगत सिंह कोश्यारींना लग्नपत्रिका देताना दिसताहेत. ही लग्नपत्रिका निळ्या रंगाची दिसतेय.

हा फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलंय-'मी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल "भगत सिंह कोश्यारी जी" यांना भेटले. यासाठी आभार मानते. मला माहिती आहे की, आपण खूप कामात व्यग्र आहात सर. मी आभारी आहे की आपण राजभवनमध्ये आमच्यासोबत बातचीत करण्यासाठी वेळ काढला.'

कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघे १४ डिसेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT