Latest

Anil Parab in money laundering case: अनिल परब यांना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा; २८ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री अनिल परब यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांच्यावर मंगळवारपर्यंत (दि.२८) कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब यांना या प्रकरणात काहीसा दिलासा मिळाला आहे.

ईडीने सुरू केलेल्या कारवाईला आव्हान देत, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती याचिका अनिल परब यांनी दाखल केली होती. या याचिकेवर तातडीने न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने दखल घेत मंगळवारी (दि.२८) तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT