Latest

Cabinet Decision : आनंदाच्या शिध्यात मिळणार मैदा आणि पोहेही; मंत्रिमंडळाचा निर्णय

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात 'आनंदाचा शिधा' देण्याचा निर्णय आज (दि.३) मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Decisions) घेण्यात आला आहे. याआधी देण्यात आलेल्या आनंदाच्या शिध्यात एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येत होते. मात्र यावेळी मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या : 

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये विदर्भ, मराठवाड्यातील कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यात येणार असून उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात येणार असून ४५ पदांना मंजुरी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझेक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT