Latest

‘अंबानी, अदानी रोजगार निर्माण करतात म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे’ : के. जे. अल्फोन्स

अनुराधा कोरवी

दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अंबानी आणि अदानी रोजगाराच्या संधी निर्माण करतात म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे, असे वक्तव्य भाजप खासदार के. जे. अल्फोन्स यांनी गुरुवारी राज्यसभेत केले आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे १० हजार लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या असल्याची माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली होती. यानंतर के. जे. अल्फोन्स यांनी केंद्र सरकारला चांगलेच घेरत या मुद्द्यावर जोर दिला.

अधिवेशनात देशातील वाढत्या बेरोजगारीवर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. या चर्चेत भाजप खासदार के. जे. अल्फोन्स यांनी भाग घेवून अंबानी, अदानी रोजगारांच्या संधी निर्माण करतात म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे असे वक्तव्य केले.

याच दरम्यान 'तुम्ही माझ्यावर भांडवलदारांचे मुखपत्र असल्याचा आरोप करू शकता. कारण मी देशात ज्यांनी रोजगारांच्या संधी निर्माण केल्या आहेत. त्या भांडवलदारांची नावे घेवू शकतो. याआधी तुम्ही देखील त्यांची नावे घेतली आहेत. भांडवलदारमध्ये रिलायन्स, अंबानी, अदानी किंवी कोणीही असो त्यांनी देशात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.' यामुळेच त्याचा आदर करणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी उघोगपतीच्या संपत्तीत वाढ झाल्याचे सांगितले. एलन मस्कच्या संपत्तीत १०१६ टक्के, गुगलचे संस्थापक लॅरी पेज यांच्या संपत्तीत १२६ टक्के आणि बेझोस यांच्या संपत्तीतही ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बिल गेट्स यांच्या संपत्तीत ३० टक्क्यांनी वाढली आहे. पुढे त्यांनी जागतिक विषमता ही वस्तुस्थिती आहे. जगातील तीन अब्ज लोक दिवसाला पाच डॉलरपेक्षाही कमी पैशात उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT