पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा फेम अल्लू अर्जुनने सरत्या वर्षाची संध्याकाळ गोव्यात घालवली. (Allu Arjun) पुष्पा स्टारने आपल्या परिवार आणि मित्रांसोबत व्हेकेशन एन्जॉय केलाय ही माहिती अल्लूने दिली नाही तर त्याच्या पत्नीने शेअर केलेल्या फोटोंवरून त्यांच्या व्हेकेशनची माहिती समोर आलीय. त्याची पत्नी स्नेहा रेड्डीने काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने हे स्टार कपल सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचे समजले. स्नेहा अल्लू रेड्डीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटोज शेअर केले आहेत. (Allu Arjun)
फोटोमध्ये पुष्पा स्टारच्या पत्नीचा स्वॅग पाहायला मिळत आहे. ती मॉडर्न लूकमध्ये खूप सुंदर दिसतेय. फोटोमध्ये स्नेहा आपली बहीण आणि मित्रांसोबत बीच किनारी पोझ देताना दिसते. फोटो पोस्ट करून स्नेहाने लिहिलं, हॅप्पी न्यू ईअर २०२३. यानंतर तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पूर आला.
फोटोंमध्ये स्नेहा अल्लू रेड्डी आपली बहिण स्वाती सोबत चिल करताना दिसते. पुष्पाः द रूलच्या शूटिंग आधी अल्लू अर्जुन काही वेळ आपल्या परिवार आणि जवळच्या मित्रांसोबत टाईम स्पेंड करत आहे. स्नेहा आणि अल्लू रम्य संध्याकाळी बीचवर उभे असाताना दिसताहेत. पण, त्यांनी लोकेशनविषयी सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसर, त्यांनी नव्या वर्षांचं स्वागत गोव्यात केल्याचं समजतंय.
फोटोंमध्ये स्नेहा आणि त्यांच्या मित्रांचा स्टायलिश लूक समोर आला आहे. तमाम अभिनेत्रींवर स्नेहा रेड्डीचा गॉर्जियस अवतार भारी पडलाय. नेहमीच तिने आपल्या फॅशन स्टाईलने सर्वांना घायाळ केलं आहे. अल्लू अर्जुनच्या पत्नीचे फोटो पाहिल्यानंतर तिच्या ग्लॅमरपुढे सर्वच फेल दिसेल.
अल्लू अर्जुन – स्नेहाने २०२२ च्या शेवटच्या दिनी ३१ डिसेंबर रोजी बीच किनारी हॉटेलमध्ये डिलीशियस पदार्थांची चव चाखली. अल्लू अर्जुन – स्नेहा रेड्डीसोबत चिल करताना दिसतोय.