Latest

Alcohol Effects on the Brain : दारुचा पहिलाच ‘प्‍याला’ ठरु शकतो व्‍यसनाचे कारण!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दारुचा पहिला प्‍याला हाती घेतला जातो तेव्‍हाच व्‍यसनाची सुरुवात होते, असा निष्‍कर्ष जर्मनीतील कोलोन विद्यापीठात झालेल्‍या संशोधनात नोंदविवण्‍यात आला आहे. प्राण्‍यांवरील अभ्‍यासात स्‍पष्‍ट झाले की, काही प्रमाणात केलेल्‍या दारु सेवनही मेंदूच्‍या मज्‍जातंतूवर दीर्घकाळासाठी परिणाम करतात. ( Alcohol Effects on the Brain ) त्‍यामुळेच दारुचा पहिला घोटाचे रुपांतर कायमस्‍वरुपी व्‍यसनात होण्‍याचा धोका असतो. मज्‍जासंस्‍थेचे काम बाह्य जगातील सूचना देण्‍याचे असते यावरच दारुचा परिणाम होतो.
कोलोन विद्यापीठात दारु व्‍यसन कसे जडते? यासाठी उंदीर आणि माशांवर संशोधन करण्‍यात आले. या संशोधनाचा अहवाल प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

प्राण्‍यांवर करण्‍यात आलेले संशोधनात स्‍पष्‍ट झाले की, पहिल्‍यांदा करण्‍यात आलेल्‍या दारुचे सेवन केल्‍यानंतर याची सूचना हे मेंदूतील पहिल्‍या न्‍यूरॉन्‍समधून ( मज्‍जापेशी) दुसर्‍या न्‍यूरॉन्‍सला दिले जाते. मेंदूत होत असलेल्‍या हा बदल दीर्घकाळासाठी होतो. आजवर दारुच्‍या व्‍यसनाबाबत मेंदूचे नियंत्रण केंद्र असलेल्‍या हायपोथालेमसवर संशोधन झाले आहे. मात्र आम्‍ही प्रथम अल्‍कोहोल सेवन करताना मेंदूतील न्‍यूरॉन्‍समध्‍ये नेमके कोणते बदल होतात, यावर लक्ष केंद्रीत केले होते. यावेळी निदर्शनास आले की, अल्‍कोहोल सेवनानंतर कायमस्‍वरुपी मेंदूतील न्‍यूरॉन्‍समधून ( मज्‍जापेशी) दुसर्‍यान्‍यूरॉन्‍समध्‍ये सूचना दिली जाते. हे बदल कायमस्‍वरुपासाठी असतात, त्‍यामुळे दारुचे व्‍यसन हे प्रथम करतानाच लागण्‍याचा धोका अधिक असल्‍याचे संशोधनात स्‍पष्‍ट झाले, असे कोलोन विद्यापीठातील संशोधक हेन्रिक स्कोल्झ यांनी सांगितले. ( Alcohol Effects on the Brain )

दारुसेवनानंतर प्राण्‍यांच्‍या चेतापेशीमधील संतुलन विस्‍कळीत झाल्‍याचे निदर्शनास आले. हा बदल कायमस्‍वरुपीसाठी होतो. कारण ज्‍या उंदीर आणि फाळांवरील माश्‍यांवर हे संशोधन झाले त्‍यांनी पुन्‍हा पुन्‍हा दारुचे सेवन केले. दारु जेव्‍हा प्रथम पिली जाते तेव्‍हाच मेंदूतील स्‍मृतींच्‍या निर्मितीतील केंद्रस्‍थानी बदल होतात. हे बदल व्‍यसनाधीन वर्तनासाठी पूरक ठरतात, असेही स्‍कोल्‍झ यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT