Latest

Akola Farmer Suicide : स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत शेतकऱ्याची आत्महत्या

backup backup

Akola Farmer Suicide : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेल्याचा उल्लेख आहे. त्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे, असे प्रविण बाबुलाल पोळकट (रा. साखरी) या शेतकऱ्याने म्हटलं आहे.

सविस्तर असे की, साखरी येथील युवा शेतकरी प्रवीण बाबूलाल पोळकट यांच्यावर को. ऑप बँक तसेच महिंद्रा कोटकचे कर्ज होते.

Akola Farmer Suicide : कर्जाचे हप्ते भरू न शकल्याने आत्महत्या

यावर्षी झालेल्या नापिकीमुळे कर्जाचे हप्ते ते भरू शकले नाही म्हणून त्यांचा छोटा ट्रॅक्टर १८ नोव्हेंबर रोजी फायनान्स वाल्यांनी ओढून नेला. ही बाब त्यांच्या मनाला लागली.

याच विवंचनेतून त्यांनी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत त्यांना अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. १९ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी त्यांनी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

त्यात त्यांनी रोहन काळे व महिंद्रा कोटक चा उल्लेख केला असून त्यांच्या आत्महत्येस यांना जबाबदार धरण्यात यावे असे म्हटले आहे. रोहन काळे व महिंद्रा कोटक विरुद्ध कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली (एक ४ वर्षाची, एक २ वर्षाची) तसेच आजारी आई व वडील आहेत.

SCROLL FOR NEXT