Latest

‘सपा’तील काका-पुतण्‍याचा वाद पुन्‍हा चव्‍हाट्यावर : ‘मुलायम यांना ‘आयएसआय’ एजंट म्‍हणणार्‍यांचे समर्थन कशासाठी ?’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : समाजवादी पार्टीमधील काका-पुतण्‍याचा वाद पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आला आहे. आता निमित्त आहे राष्‍ट्रपती निवडणुकीचे. समाजवादी पार्टीचे आमदार शिवपालसिंह यादव यांनी अखिलेश यादव यांना पत्र पाठवून राष्‍ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्‍हा यांना देण्‍यात आलेल्‍या समर्थनाचा पुनर्विचार करण्‍याचे आवाहन केले आहे.

शिवपालसिंह यादव यांनी पत्रात म्‍हटलं आहे की, "ज्‍या व्‍यक्‍तीने एकेकाळी मुलायमसिंह यादव यांना पाकिस्‍तानची गुप्‍तहेर संघटना 'आयएसआय'चा एजंट म्‍हटले होते. त्यांनh समाजवादी पार्टीने राष्‍ट्रपती निवडणुकीत समर्थन जाहीर करणे हे वेदनादायी आहे. एकेकाळी समाजवादी पार्टी मुलायम सिंह यादव यांच्‍याविरोधात एकही चुकीचा शब्‍द ऐकण्‍यास तयार नसे. आज हाच पक्ष मुलायमसिंह यादव यांच्‍यावर बोचरी टीका करणार्‍या राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीतील उमेदवाराचे समर्थन करत आहे. "

मला माझ्‍या मर्यादेची जाणीव आहे. तरीही राष्‍ट्रपती निवडणुकीसंदर्भात पक्षाने घेतलेल्‍या निर्णयाचा पुनर्विचार करण्‍यात यावा, अशी मागणीही शिवपाल यादव यांनी केली आहे. समाजवादी पार्टीने राष्‍ट्रपतीपदाच्‍या निवडणुकीत घेतलेल्‍या निर्णयाचा माझा तीव्र विरोध आहे. मुलायमसिंह यादव यांचा अपमान हा कोणत्‍याही परिस्‍थितीत सहन केला जाणार नाही, असेही शिवपालसिंह यादव यांनी आपल्‍या ट्‍विटमध्‍ये म्‍हटलं आहे. तसेच त्‍यांनी यशवंत सिन्‍हा यांनी मुलायम सिंह यांना 'आयएसआय' एजंट म्‍हटल्‍याचे वृत्तही ट्‍विट केले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT