वर्धा : तब्बल २० तासाच्या शोधकार्यानंतर सापडला प्राध्यापकाचा मृतदेह; वर्धा नदीत घेतली होती उडी

वर्धा : तब्बल २० तासाच्या शोधकार्यानंतर सापडला प्राध्यापकाचा मृतदेह; वर्धा नदीत घेतली होती उडी
Published on: 
Updated on: 
वर्धा : पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजी पंत) नजीकच्या वर्धा नदीच्या पात्रामध्ये गुरुवारी (१4 जुलै) प्राध्यापकाने उडी घेतली होती. तब्बल २० तासांच्या शोधकार्यानंतर बारा किलोमीटर अंतरावर  प्राध्यापकाचा मृतदेह आढळला. प्राध्यापकाचे नाव विनोद बागवाले (वय ५२) असे आहे.
विनोद बागवाले हे काटोलच्या नबीरा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, असे सांगण्यात आले. गुरुवारी त्यांनी वर्धा नदीपात्रात उडी घेतली होती. ही बाब काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना, प्रशासनाला माहिती देण्यात आली. नदीपात्रात उडी घेतलेल्या प्राध्यापकाचा शोध घेण्यास वर्धा येथून पोलिसांचे पथकसुद्धा एका अत्याधुनिक बोटीसह बोलावण्यात आले होते. शुक्रवारी पुन्हा पोलीस पथकाने नव्याने शोध कार्य सुरू केले.
जवळपास १२ किलोमीटरचा नदीचा परिसर पिंजून काढला. टाकरखेड येथून तापसकार्याला सुरुवात करण्यात आली होती. आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) परिसरात प्राध्यापकाचा मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news