Latest

व्हीएसआयच्या बैठकीला अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांची दांडी

मोहन कारंडे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाच्या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि.१०) सकाळी सुरूवात झाली आहे. मात्र, पुण्यात असूनही पुन्हा एकदा व्हीएसआयचे संचालक व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत व्हीएसआयचे उपाध्यक्ष व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हेसुद्धा पुण्यात असूनही त्यांनी बैठकीला येण्याचे टाळले आहे.

आजच्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील, राजेश टोपे, बबनदादा शिंदे, विशाल पाटील यांच्यासह अन्य सदस्य बैठकीला उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच्या नियामक मंडळाच्या बैठकीस सर्व सदस्य उपस्थित राहण्याची अपेक्षा होती. मात्र, गैरहजर सदस्यांची संख्या अधिक राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

व्हीएसआयच्या नियामक मंडळाच्या बैठकीस उपस्थित राहण्यास अजित पवार टाळत आहेत. त्याची पुनरावृत्ती आजच्या बैठकीनिमित्त पुन्हा एकदा दिसून आली. मात्र, वळसे पाटील हे व्हीएसआयच्या कामात रस घेऊन इतर वेळीसुद्धा आढावा घेतात. मात्र, त्यांनीसुद्धा बैठकीला येण्याचे टाळले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT