Latest

Ponniyin Selvan 2: ऐश्वर्याच्या चित्रपटाची दमदार ओपनिंग, पहिल्या दिवशी इतक्या कोटींची कमाई

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संस्कृती आणि भूतकाळातील कहाणी दाखवत चित्रपट इंडस्ट्रीत अनेक चित्रपट येत आहेत. (Ponniyin Selvan 2) त्यापैकी एक बॉलीवूड क्वीन ऐश्वर्या राय बच्चन बच्चनचा 'पोन्नियन सेल्वन 2' ने चित्रपटगृहात दाखल झाला. 'कांतारा' असो वा 'दसरा' मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपट 'पीएस 2' चीदेखील चलती आहे. मागील वर्षी या चित्रपटाचा पहिला भाग 'पीएस १' रिलीज झाला होता. प्रेक्षकांकडून चांगली पसंती देखील मिळाली. पीएस १ नंतर प्रेक्षक पीएस २ ची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. पीएस २ विषयी अनेक लोकांनी सोशल मीडियावर फर्स्ट डे फर्स्ट रिव्ह्यू शेअर केला आहे. तर चित्रपटाचे 'ओपनिंग डे'चे आकडे समोर आले आहेत. (Ponniyin Selvan 2)

पहिल्या दिवशी इतकी कमाई

मणिरत्नम दिग्दर्शित 'पीएस २' देखील दमदार दृश्यांनी भरपूर आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन रिअल दिसतात. हा चित्रपट तमिळसोबत हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू भाषेत रिलीज करण्यात आलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीच्या आकड्यांमध्ये चित्रपटाने ३२ कोटींचा गल्ला जमवला.

कल्कि कृष्णमूर्तींच्या कादंबरीवर आधारित कहाणी

'पोन्नियिन सेल्वन'चा पहिल्या आणि दुसऱ्या भागाची कहाणी याच नावाने असलेल्या कल्कि कृष्णमूर्तींच्या कादंबरीवर आधारित आहे. पीएस 2 ची कहाणी तेथूनचं सुरू होते, जेथून नंदिनीने चोल साम्राज्य संपुष्टात आणण्याचे एकमेव लक्ष्य ठेवले होते. चित्रपटात चियान विक्रम आणि ऐश्वर्या राय शिवाय तृषा कृष्णन, जयम रवी आणि कार्थी देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाला एआर रहमान यांचे संगीत आहे.

SCROLL FOR NEXT