Latest

aishwarya narkar : ‘तू नजर लागावी अशीच आहेस’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

वयाची पन्नाशी उलटूनही आपल्या सौंदर्याने मोहिनी टाकणाऱ्या ऐश्वर्या नारकरला (aishwarya narkar) पाहून तुम्ही म्हणाल, व्वा क्या बात है! सोशल मीडियावर नेहमी ॲक्टीव्ह असणारी ऐश्वर्या नारकरचा (aishwarya narkar) चाहता वर्ग मोठा आहे. ती आपल्या चाहत्यांशी नेहमीचं कोणत्या ना कोणत्या मार्गाने कनेक्ट राहते. ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आताही तिने आपला लेटेस्ट फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केलाय. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, नजर लागेल गं बाई!

ऐश्वर्या नारकर
ऐश्वर्या नारकर

नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंना खूप सारं प्रेम आणि शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी हार्ट इमोजी शेअर करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. काही नेटकऱ्यांनी म्हटलंय-BLACK color is symbol of mystery, power, elegance, and sophistication ?, नजर लगती है हर खूबसूरत चीज को ..काला रंग pahena करो ????, Beauty In Black …काळ्या रंगाचे कपडे वापरू नकोस; नजर लागेल, Charming ♥️, Sunder, ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️, I love u taidu❤.

ऐश्वर्या नारकर
ऐश्वर्या नारकर

दोन दिवसांपूर्वीचं, तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला प्रिंटेड साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. तर काळ्या रंगाच्या साडीमध्येही तिने काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत. काही मोजक्या फोटोंमध्ये तिने चष्मा घातलेला दिसतो. काही फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा टिपलेल्या दिसतात. तर काही फोटोंमध्ये ती खुलून हसताना दिसतेय. काळ्या रंगाच्या साडीमध्य़े तिचं सौंदर्य आणखी बहरून आलेलं दिसत आहे. तिने साडीवर झुमके घातलेले दिसत असून ओपन हेअर स्टाईल केलीय.

ऐश्वर्या नारकर

ऐश्वर्याच्या इंन्स्टाग्रामवर अनेक नवनविन फोटो पाहायला मिळताहेत. नेटकऱ्यांच्या कमेंट्समधूनचं स्पष्ट होतयं की, तिचा किती ममोठा चाहता वर्ग आहे.  ऐश्वर्याने 'अपराध', 'धड़क', 'अंकगणित' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही ती झळकलीय. सध्या ती काशीबाई बाजीराव बल्लाळ या मालिकेत भूमिका साकारतेय.

ऐश्वर्या नारकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT