Latest

Saurabh Gokhale : इतिहास म्हणून न पाहता कलाकृती…; सौरभ गोखले साकारणार ‘नथुराम गोडसे’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारणारा सौरभ गोखले ( Saurabh Gokhale ) आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता शरद पोंक्षेंनतर आता सौरभ 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणार आहे. सौरभने याआधी 'वीर सावकर' मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि 'आवाज' मध्ये संत ज्ञानेश्वर यांच्या दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबधित बातम्या 

या भूमिकेविषयी बोलताना सौरभने ( Saurabh Gokhale ) सांगितले आहे की, 'तीन वेगवेगळ्या धाटणीच्या, वेगवेगल्या कालखंडातील भूमिका साकारायला मिळणं ही एखाद्या अभिनेत्यासाठी उत्तम संधी आहे. दिग्गज कलाकार शरद पोंक्षे यांच्यानंतर नथुराम गोडसे यांची भूमिका साकरणं आव्हानात्मक आहे. मी या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्यासाठी कट्टीबद्ध राहीन. आधीच्या पिठीप्रमाणे तरुण पिढीलादेखील इतिहास माहिती करून देण्यासाठीचा हा आमचा प्रयत्न आहे. ऐतिहासिक घटना रंगभूमीवर येतात तेव्हा त्याकडे इतिहास म्हणून न बघता केवळ कलाकृती म्हणूनच बघितलं पाहिजे'. असेही त्याने यावेळी म्हटलं आहे.

सौरभने याआधी 'गांधीहत्या आणि मी' या नाटकात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचे लेखन प्रदीप दळवी यांनी केलं आहे. याशिवाय सौरभने वीर सावकर' वेब सीरिजमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि 'आवाज' मालिकेत संत ज्ञानेश्वर यांच्या दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. यामुळे या नाटकासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT