Latest

Urfi Javed Video : यावेळी काहीतरी हटके?; उर्फी टॉपलेस होऊन रेस्टॉरंटमध्ये

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमी या ना त्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी ती तिच्या अतरंगी फॅशनने तर कधी तिच्या अनोख्या कारनाम्याने तिची चर्चा होत असते. काही वेळा तिच्या अतरंगी फॅशनने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत चांगलेच धारेवर धरले आहे. तरीपण तिची अंतरंगी फॅशन काही संपत नाही. आताही तिने अशी काही फॅशन केलीय, की सर्वांच्या नजरा तिच्यावरचं खिळल्या होत्या. उर्फीच्या आणखी एका टॉपलेस व्हिडिओने ( Urfi Javed Video) सोशल मीडियाचे तापमान वाढवलं आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद २०२३ या नववर्षाच्या स्वागतासाठी तयारीला लागली आहे. नवर्षाच्या आधी एक दिवस ती काही मित्रांसोबत मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी पोहोचली आहे. याच दरम्यान उर्फी रेस्टॉरंटच्या दरवाज्यातून आत जाताना पापराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी खास करून उर्फी टॉपलेस असूनही कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत.

यावेळी उर्फीने गळ्यात एक भला मोठा डायमंड स्टोन नेकलेस परिधान केला होता. यासोबत तिने ब्लॅक रंगाचा शॉर्ट स्कर्टदेखील परिधान केला होता. केसांची स्टाईल, हाय हिल्स, ग्लिटरी मेकअप आणि लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे. उर्फीचा हा हॉट व्हिडिओ विरल भयानी यांच्या इन्स्टाग्रामवर ( Urfi Javed Video ) व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांना तिचा हा लूक आवडलाय तर काहींना उर्फीचा लूक आवडलेला दिसत नाहीत. यात एका युजर्सने 'हिला प्राणीसंग्रहालयात बंद करा, असे रिकामे सोडू नका अशी मिश्किल कमेंट केलीय.' आणखी काही युजर्सनी म्हटले आहे- 'उर्फीचे स्वतःचे एक वेगळे जग आहे, ज्यामध्ये ही फॅशन टीचर स्वतः आणि स्वतःच विद्यार्थी आहे.' असे लिहिले आहे.

हेही वाचलंत का? 

(video : viralbhayani instgram वरून साभार)

SCROLL FOR NEXT