Latest

Kajol : अभिनेत्री काजोलचा ‘त्या’ वादग्रस्त व्यक्तव्यावर खुलासा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडमधून काही काळ ब्रेक घेतलेली अभिनेत्री काजोल ( Kajol ) 'द ट्रायल' वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे. सध्‍या ती वेबसीरीजच्या प्रमोशन करत आहे.  तिने एका मुलाखतीत देशातील राजकारणी अशिक्षित आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला हाेता. आता काजोलने या व्यक्तव्यावर खुलासा केला आहे.

माझा हेतू राजकीय नेत्यांची बदनामी करण्याचा नव्हता

ट्रोल झाल्यानंतर काजोलने ( Kajol ) सोशल मीडियावर एक ट्विट पोस्ट करत म्हटलं आहे की, 'मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व किती असते याबद्दल बोलत होते. माझा हेतू कोणत्याही राजकीय नेत्याची बदनामी करण्याचा किवा त्यांना दुखवण्याचा नव्हता. तसेच आमच्याकडे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर नेत आहेत.'

'द ट्रायल' वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान काजोलने म्हटलं होतं की, 'भारतातील बदल खूप मंद गतीने होत आहे कारण, नागरिक रूढी-परंपरांमध्ये अडकले आहेत. देशातील काही भागात अजूनही चांगले शिक्षण मिळत नाही. आपल्या देशात अशिक्षित राजकीय नेते आहेत. कोण आमचे नेतृत्व करत आहे हे समजत नाही. देशातील राजकारण्यामध्ये असे बरेच लोक आहेत, ज्यांना योग्य दृष्टीकोन माहित नाही. या गोष्टी फक्त माझ्या मते, शिक्षणाच्या अभावामुळे होत आहेत.' या व्यक्तव्यानंतर सोशल मीडियात काजोल माेठ्या प्रमणावर ट्रोल झाली हाेती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT