Latest

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसचा देशाबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न; ईडीचा कोर्टात दावा

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) नियमित जामिनाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या ईडीच्या अर्जात मोठा खुलासा करण्यात झाला आहे. जॅकलिनने तपासादरम्यान पुराव्यांशी छेडछाड केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. तिने मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. तसेच जॅकलीनने तपासादरम्यान देशातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता, असा दावा ईडीने कोर्टात केला. दरम्यान कोर्टाने जॅकलिनला १० नोव्हेंबर पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.

ईडीने सांगितले की, जॅकलीनला पुरावे दाखवल्यावर किंवा इतर आरोपींसमोर बसून चौकशी दरम्यान आरोपांची कबुली दिली होती. पण, तिने कधीही तपासात सहकार्य केले नाही. ईडीने न्यायालयाला सांगितले की, तपासादरम्यान जॅकलिनचे वर्तन चांगले राहिले नाही, त्यामुळे साक्षी आणि पुरावे ती नष्ट करु शकते. (Jacqueline Fernandez)

या युक्तिवादांसह ईडीने पटियाला कोर्टात आपला जबाब नोंदवला आणि जॅकलिनला जामीन देण्यास विरोध केला. तत्पूर्वी, दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ईडीने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता. तुम्ही आरोपपत्राची प्रत सर्व आरोपींना दिली का? असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. जॅकलिनच्या वकिलाने सांगितले की, ईडीने कोर्टाला सांगितले की त्यांनी आरोपपत्राची प्रत दिली पण, त्यानंतरही आम्हाला ती मिळाली नाही. (Jacqueline Fernandez)

जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलाने सांगितले की, पुरवणी आरोपपत्रात जॅकलिनचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाने ईडीला आरोपपत्राच्या प्रती सर्व आरोपींना देण्याचे आदेश दिले. जॅकलिनला दिलेला अंतरिम दिलासा पुढील सुनावणीपर्यंत कायम राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT