Latest

विजयच्या ‘Thalapathy 68’ चा पहिला लूक; विजयकांत यांच्या निधनामुळे येणार पुढील वर्षात

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक व्यंकट प्रभू आणि साऊथ स्टार विजय थलपथी यांचा आगामी 'थलापथी 68' ( Thalapathy 68 ) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे अधिकृत्त नाव अध्याप ठेवलेले नाही. मात्र, चित्रपटाचे शूटिंग जोरदार सुरू आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. आणि लवकरच 'टायटल'चे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान चित्रपट निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे यांची घोषणा केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर चित्रपटातील एक लूक व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या 

नुकतेच एक्स टविटरवर वियज थलपथीच्या आगामी 'थलापथी 68' या चित्रपटातील एक फोटो पाहायला मिळत आहे. या फोटोत एक क्रॉस असलेलं चिन्ह (विमानची छाया) आणि थोडीशी निळसर रंगाची जमिन आणि पुढे अथांग समुद्र दिसतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये '#Thalapathy68FirstLook at 6pm today !! ?'. लिहिले आहे. हा फोटो जरी सोशल मीडियावर व्हायरल झाला असला तरी चित्रपट रिलीज होण्याची अधिकृत्त माहिती अध्याप निर्मात्यांनी दिलेली नाही.

तर दुसरीकडे अभिनेता विजयकांत यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे 'थलपथी 68' चे शीर्षक (टायटल) आणि फर्स्ट लुक लॉन्चिग सोहळा नवीन वर्षात पुढे ढकलले जाऊ शकते असे बोलले जात आहे. व्यंकट प्रभू दिग्दर्शित, 'थलपथी 68' हा एक टाईम ट्रॅव्हल चित्रपट आहे. या चित्रपटात विजय दुहेरी भूमिका साकारत आहे. तर चित्रपटाला युवन शंकर राजा यांनी संगीत दिले आहे. तसेच या मल्टीस्टारर ड्रामा चित्रपटात विजयसोबत अनेक दिग्गज कवलाकारांनी यात भूमिका साकारल्यात.

गेल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेता विजयकांत यांच्या अंत्यसंस्काराला थलपथी विजय यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देताना थलपती विजय खूपच भावूक झाला होता. त्याला अश्रू अनावर झाले होते. विजय आणि विजयकांत यांच्यात बंधुत्वाचे संबंध होते. दोघांनी १९९३ साली आलेल्या 'सेंधूरापांडी' या तमिळ चित्रपटात एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्याच्यांत खास मैत्री होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT