पुढारी ऑनलाईन डेस्क : डीएमडीके प्रमुख विजयकांत यांच्या जाण्याने मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्यासारखा नेता आणि अभिनेता कोणीच नव्हता. (Rajinikanth on Vijaykanth) अशी भावना साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केली. ते तुतीकोरीन विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, माझे हृदय तुटले आहे, त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती होती. (Rajinikanth on Vijaykanth)
संबंधित बातम्या –
तुतीकोरीन विमानतळावरून प्रसारमाध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाले, "माझ्या हृदयाला वेदना होत आहेत. विजयकांत प्रचंड इच्छाशक्ती असलेला माणूस होता. शेवटी, मी त्यांना डीएमडीकेच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये पाहिले आणि मला वाटले की, ते त्यांच्या प्रकृतीशी संबंधित समस्यांशी झुंज देऊन परत येतील. पण त्यांचे निधन झाले. तामिळनाडूच्या जनतेचे मोठे नुकसान आहे.
ते पुढे म्हणाले, "जर ते निरोगी असते तर ते राजकारणातील एक जबरदस्त शक्ती बनले असते. त्यांनी लोकांसाठी खूप चांगली कामे केली असती. तामिळनाडूच्या लोकांनी आता त्यांना गमावले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो."
साऊथ अभिनेता सूर्याने ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तो म्हणाला की, त्यांच्यासोबत काम करणे, बोलणे, खाणे हे दिवस अविस्मरणीय आहेत…त्यांनी कधीही कोणाला नाही म्हटले नाही. करोडो लोकांना मदत करून क्रांतिकारी कलाकार म्हणून उदयास आलेले भाऊ विजयकांत यांच्या निधनाबद्दल भावपूर्ण शोक!!
दरम्यान, रजनीकांत यांनी विजयकांत यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विजयकांत यांच्य कुटुंबीयांची सांत्वना केली.