Latest

Kartik Aaryan : कार्तिकचा शहजादा’च्या सेटवर अपघात (Photo viral)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आपल्या आगामी 'शहजादा' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहेत. याच दरम्यान कार्तिकच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 'शहजादा' चित्रपटाच्या सेटवर कार्तिकचा अपघात झाला असून त्यात तो जखमी झालाय. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबतची माहिती स्वत: कार्तिकने सोशल मीडियावर दिली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनने ( Kartik Aaryan ) नुकतेच त्याच्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत कार्तिक स्वत:चे पाय बादलीतील पाण्यात घालून आणि हातात बर्फ घेऊन बसलेला दिसतोय. यावरून 'शहजादा' चित्रपटाच्या सेटवर कार्तिकच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने 'Ghutne toot gaye ?, Ice Bucket Challenge 2023 starts now #Shehzada #SongShoot #CalvesGone ?'. असे लिहिले आहे. या घटनेची माहिती सोशल मीडियावर मिळताच चाहत्यांनी कार्तिकच्या दुखापतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कार्तिकचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. कार्तिकच्या या फोटोवर चाहत्यासह अनेक कलाकारांनी कॉमेन्टस केल्या आहे. यात भारतीय नृत्यांगना मुक्ती मोहनने कार्तिकच्या फोटोवर 'मला वाटते तुम्ही लवकर बरे व्हावे आणि काळजी घ्यावी, अशी माझी इच्छा आहे, असे लिहिले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT