‘RRR’ चे लॉस एंजेलिसमध्ये स्पेशल स्क्रिनिंग; यंदाचा ऑस्कर ‘आरआरआर’ ला? | पुढारी

'RRR' चे लॉस एंजेलिसमध्ये स्पेशल स्क्रिनिंग; यंदाचा ऑस्कर 'आरआरआर' ला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : लॉस एंजेलिसमध्ये नुकतेच ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. त्यानंतर चित्रपटातील संपूर्ण टीमचे ऑस्कर अकादमीच्या सदस्यांकडून स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि ज्युनियर एनटीआर तिथे उपस्थित होते. यामुळे यंदाचा ऑस्कर पुरस्कार ‘आरआरआर’ चित्रपटाला मिळणार असल्याचे हॉलिवूड अभिनेता जेसन ब्लूम यांनी म्हटलं आहे. परंतु, अद्याप याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राजामौली सध्या गोल्डन ग्लोबमध्ये सहभागी होण्यासाठी लॉस एंजेलिसमध्ये आले होते. जिथे त्यांचा ‘RRR’ चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट गाणे या दोन श्रेणींसाठी नामांकन करण्यात आला आहे. या कार्यक्रमात परदेशी नागरिक, प्रतिनिधी, अकादमीचे सदस्य आणि इतरांसह सुमारे १०० हून अधिक लोकांनी डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका थिएटरमध्ये हा चित्रपट पाहिला.

यावेळी ज्युनियर एनटीआर आणि राजामौली यांच्याशी संवाद साधला. यावेळी दिग्दर्शकांनी चित्रपटातील अनेक गंमतीशीर किस्से शेअर केले. यावेळचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधी हॉलिवूड स्टुडिओचे संस्थापक जेसन ब्लूम यांनी एक ट्विट करत यावर्षीचा ऑस्कर ‘आरआरआर’ या चित्रपटाला मिळणार असं म्हटलं आहे.

हेही वाचा : 

Back to top button