Latest

आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ नंतर ‘Campeones’ चा रिमेक आणणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

आमिर खान कॅम्पिओन्स (Campeones) हिंदी रिमेकवर काम करत आहे. प्रेक्षक आमिर खान या बॉलिवूड अभिनेत्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आमिर खान याच्या चित्रपटांमध्ये एक खास संदेश असतो. त्याच्या नव्या चित्रपटांची प्रेक्षकांना आतुरता आहे. १४ मार्च रोजी आमिर त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मीडियाला भेटला. त्यावेळेस मीडियाने त्याला त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रश्न विचारले.

काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, आमिर 'शुभ मंगल जरा सावधान' दिग्दर्शित करणार आहे. आर. एस. प्रसन्नासोबत एक स्लाईस ऑफ लाईफ चित्रपटाची योजना करत आहोत. हा स्पॅनिश चित्रपट 'कॅम्पेनियन्स'चा रिमेक असेल. बर्थडे पार्टी दरम्यान आमिरला या चित्रपटाबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, आपला चित्रपट नियोजनाच्या टप्प्यावर आहे. चित्रपटाचे नियोजन पूर्ण झाल्यावर ते स्वत: त्याची घोषणा करेल.

आमिरच्या म्हणण्यानुसार, 'त्याने अद्याप या चित्रपटाची घोषणा केलेली नाही. तो म्हणाला-तुम्हाला याबद्दल कसे कळले? सध्या चित्रपट नियोजनाच्या टप्प्यात आहे. त्याचे नियोजन पूर्ण झाल्यावर मी स्वतः त्याची घोषणा करेन. या चित्रपटाबाबत काहीही सांगणे घाईचे आहे.

काय आहे 'कम्पेनियन्स' चित्रपटाची कथा

'लाल सिंह चड्ढा'नंतर आमिर खान ज्या चित्रपटावर काम सुरू करणार आहे. 'कॅम्पेनियन' हा चित्रपट एका मद्यधुंद प्रशिक्षकाभोवती फिरताना दिसतो, जो मानसिकदृष्ट्या अक्षम खेळाडूंना प्रशिक्षण देतो. या संघाने जगभरात अनेक ट्रॉफी जिंकून नाव कमावले आहे. या चित्रपटात आमिर खान प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खान पुन्हा एकदा प्रेरणादायी भूमिका साकारताना दिसणार आहे.

आमिरचा लाल सिंग चड्ढा लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून एडिटिंगचे काम सुरू आहे. या चित्रपटात करीना कपूर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

SCROLL FOR NEXT